सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालय तर्फे माजगाव नदीघाटावर स्वछता मोहीम.
सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालय तर्फे माजगाव नदीघाटावर स्वछता मोहीम.
-----------------------------पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------
ज्ञानज्योती फौंडेशन संचलित सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालय खोतवाडी यांच्यातर्फे गणेश उत्सवानंतर माजगाव नदी घाटाची स्वच्छता.
*गणेश विसर्जनानंतर माजगाव (ता. पन्हाळा) येथील नदी घाटावरती प्लास्टिक, नारळाच्या शेंड्या फटाक्यांचे बॉक्स इत्यादी कचरा नदी घाटावरती त्याचबरोबर रस्त्यावरती पडला होता.नदी पात्रातील पाणी कमी झाल्यामुळे गणेश मूर्ती उघड्यावर दिसत होत्या ही बाब लक्षात घेऊन ज्ञानज्योती फौडेशन च्या सदस्यांनी त्याचबरोबर माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सकाळी सात ते दहा या वेळेत प्लास्टिक, नारळाच्या शेंडी एकत्रित केल्या. एक ट्रॉली एवढा कचरा जमा करण्यात आला. जमा झालेला कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली . नदीपात्राबाहेरल मूर्ती पाण्यामध्ये पुन्हा विसर्जित करण्यात आल्या सुमारे 500 हून अधिक मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केल्या. या स्वच्छता अभियानामध्ये वाचनालयाची वीस विद्यार्थी, कवी संभाजी चौगले ,दगडू गुरवळ, बाळू भोमकर, प्रवीण चोपडे, दगडू पाटील, अनिकेत माने, सौरभ शिंदे, ओंकार चौगले उपस्थित होते. वाचनालयाच्या विद्यार्थ्यांना व उपस्थित सदस्यांना बाळू भोमकर यांच्याकडून अल्पोपहार सोय करण्यात आली*
Comments
Post a Comment