डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची टेक्नोलर्न पुणे कंपनीत निवड.

 डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची टेक्नोलर्न पुणे कंपनीत निवड.

 ---------------------------------

नामदेव भोसले

---------------------------------

जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ४ विद्यार्थ्यांची टेक्नोलर्न, पुणे या नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे. ही माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सौरभ खानावळे यांनी दिली.


निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागाचे आकाश रक्ताडे, आदित्य राज देसाई, एमसीए विभागाचा आशितोष पाटील व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाची श्रेया माने यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु. २.८ लाख ते ७ लाख इतक्या पॅकेजवर नियुक्ती करण्यात आली आहे.


डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंड उपस्थित होते.


निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, विभाग प्रमुख तसेच प्लेसमेंट कोऑर्डिनेटर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.