गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुशंगाने संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार

गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुशंगाने संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार




----------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी 
राजू कदम
----------------------------------

मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सागर धनाजी लोखंडे टोळीस सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून २ वर्षे कालावधीकरीता हद्दपार आदेश पारीत केलेला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढून त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे तसेच चालु गणपती उत्सव व आगामी सण उत्सव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक सुरळीत च शांततेत पार पाडणे करिता सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.

संजयनगर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख १) सागर धनाजी लोखंडे, वय ३२ वर्षे, रा. प्रिया हॉटेलचे मागे, संपत चौक, साखर कारखाना जवळ, सांगली, २) राज द-याप्पा यादव, वय २२ वर्षे, रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी, आर.टी.ओ ऑफिस जवळ, सांगली, ३) अजय राजेंद्र पाटील, वय २५ वर्षे, रा. गजेंद्र चौक, शांतिनिकेतन कॉलेज जवळ, पंचशीलनगर, सांगली या टोळीविरुद्ध सन २०२० ते २०२४ या कालावधीत इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशीर घातक शस्व जवळ बाळगणे, चोरी, चोरीचा प्रयत्न करणे, घरफोडी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नमुद सामनेवाले हे कायद्याला न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी, संजयनगर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.

पोलीस अधीक्षक, सांगली यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन, विमला एम., चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर उपविभाग, सांगली यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांनी प्रस्तावाची चौकशी करून पाठविलेला अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख १) सागर धनाजी लोखंडे, वय ३२ वर्षे, रा. प्रिया हॉटेलचे मागे, संपत चौक, साखर कारखाना जवळ, सांगली, टोळी सदस्य २) राज द-याप्पा यादव, वय-२२ वर्षे, रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी, आर.टी.ओ ऑफिस जवळ, सांगली, ३) अजय राजेंद्र पाटील, बय २५ वर्षे, रा. गजेंद्र चौक, शांतिनिकेतन कॉलेज जवळ, पंचशीलनगर, सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या २ जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरीता तडीपारी आदेश पारीत केलेला आहे. चालू गणेशोत्सव च इतर सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या काळात टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे...

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.