हातकणंगले पोलिस ठाण्यात, फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल.
हातकणंगले पोलिस ठाण्यात, फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल.
------------------------------
संस्कार कुंभार
------------------------------
कोल्हापूर : हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार फिर्यादी महिला व तिच्या पतीला अडवून शिवीगाtळ, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही घटना ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी धनगर माळ, रूई आणि हातकणंगले पोलिस ठाण्याच्या आवाराजवळ घडली. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पैशाच्या व्यवहारातून वाद निर्माण करून फिर्यादी व तिच्या पतीला अडवले. त्यावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, मारहाण व धमकावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच एका आरोपीने शस्त्र उगारल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रेम लोंढे, हिराबाई लोंढे, राणी सकट, राहुल चौगुले, अक्षय चौगुले व संजय चौगुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीवरून गुन्हा नोंद घेऊन पुढील तपास हवालदार घुगरे करत आहेत.
Comments
Post a Comment