मिरज शहरातून गेल्या काही दिवसापासून चोरीस गेलेले मोटरसायकल पकडण्यात मिरज शहर पोलीसाची दमदार कामगिरी.
मिरज शहरातून गेल्या काही दिवसापासून चोरीस गेलेले मोटरसायकल पकडण्यात मिरज शहर पोलीसाची दमदार कामगिरी.
------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजु कदम
------------------------------------
मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतुन मागील काही महिन्यांपासुन मो/सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने मा. वरिष्ठांनी सातत्याने मो/सायकल चोरीचा तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार रासकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य सुचना व मार्गदर्शन करुन तपास करण्यास सांगितले. त्यानुसार मो/सायकल चोरीचे गुन्हयांचा तपास करीत असताना मागील काही दिवसात जेल मधुन सुटलेले मो/सायकल चोरांची माहिती घेवुन त्याआधारे तपास सुरु केला. त्यादरम्यान गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणांचे महत्वाचे बंदोबस्त असताना देखील गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाचे सातत्य कायम ठेवुन यातील आरोपी अजय पटकारे याचेवर संशय बळावल्याने पोलीस पथकाने त्याचा शोध सुरु केला. सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा दिनांक 11/09/2025 रोजी हिरा हॉटेल चौक, मिरज याठिकाणी एक संशयीत मो/सायकल सह फिरत असल्याची माहिती मिळुन आली. त्यानुसार सपोनि आण्णासाहेब गादेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर ठिकाणी सापळा लावुन आरोपीस ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केला असता त्याने मिरज शहर व परीसरातील एकुण 07 गुन्हयांची कबुली दिली. त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन वर नमुद 07 मो/सायकली हस्तगत करुन वर नमुद केलेले 07 गुन्हे उघडकीस आणण्यात आले. सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस उप अधिक्षक श्री प्रणिल गिल्डा व पोनि किरण रासकर यांनी तपास पथकास महत्वाचे मार्गदर्शन केले.
अटक आरोपीतास आज रोजी मा. न्यायदंडाधिकारी, प्रथमवर्ग, मिरज यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दिनांक 13/09/2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment