अनिल कांबळे यांनी काढलेल्या ऑपरेशन सिंदूर लघुपटास मिळाले पारितोषिक.
अनिल कांबळे यांनी काढलेल्या ऑपरेशन सिंदूर लघुपटास मिळाले पारितोषिक.
-----------------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
मो .9404477703
-----------------------------------------
शाहुवाडी : पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग अंतर्गत स्त्री सक्षमीकरण या विषयावर लघुपट , रिल्स, डाक्युमेंटरी यांच्या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेत प्राथमिक शिक्षक नांदारी श्री अनिल कांबळे यांनी काढलेल्या ऑपरेशन सिंदूर या लघुपटास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
जेष्ट सिने अभिनेते अरुण नलावडे , प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे , प्रभाकर मोरे , देविका दफ्तरदार, असित रेडीज , सुनिल गोडबोले यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले
जगात परिचित असलेला पहलगाम येथिल दहशतवादी हल्ला व याला भारताने दिलेले सडेतोड प्रतिउत्तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर ही मोहीम. या दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या एका सामान्य स्त्रीची भावनिकता व पुन्हा जगण्यासाठीचा संघर्ष या लघुपटात चित्रित करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा लघुपट प्रत्येक भारतीय स्त्रीच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे .
सदर लघुपट शाहुवाडी तालुक्यातील नांदारी धनगरवाडा शाळेचे मुख्याध्यापक अनिल कांबळे व कांबळेवाडी शाळेच्या अध्यापिका स्नेहा चौधरी या दांपत्यांनी यांनी तयार केला आहे. यामध्ये डॉ.अश्विनी नारकर (रत्नागिरी ) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सदर लघुपटास शिवशंभू उद्योग समूह कळे, विश्व वारणा पब्लिक स्कूल तळसंदे , यशस्वी फाउंडेशन कोडोली , शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर , विद्या मंदिर कांबळेवाडी , डॉ.भगवान नारकर, अध्यापिका शामिली जाधव , उत्तम गुलाब पोवार आदींनी सहकार्य केले .
सदर लघुपटाच्या यशाबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती शाहूवाडी यांनी कौतुक केले आहे.

No comments: