राज्य सरकार कडून मराठा आंदोलनातील मयताच्या वारसास आ. चिखलीकर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप.
राज्य सरकार कडून मराठा आंदोलनातील मयताच्या वारसास आ. चिखलीकर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप.
---------------------------------
लोहा प्रतिनीधी
अंबादास पवार
---------------------------------
राज्यातील मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु होते दरम्यान सदर आंदोलना दरम्यान मयत झालेल्यांच्या वारसास राज्य सरकार कडून प्रत्येकी दहा लाखांचीआर्थिक मदत देण्यात आली असून दि. १२ रोजी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सदरील धनादेशाचे वाटप करण्यात आले.
लोहा तहसील कार्यालयात दि. १२ रोजी शुक्रवारी दुपारी आयोजित कार्यक्रमात मराठा आरक्षण लढ्यात मयत झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारने आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. मराठा समाज आरक्षण लढ्याचे प्रमुख आंदोलक मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनात लोहा तालुक्यातील चार मराठा बांधव मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या वारसास राज्य सरकार अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले होते. दि. १२ रोजी तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मयताच्या कुटुंबियांना दहा लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये लोहा तालुक्यातील सुमित शरद ढेंबरे रा. बेरळी (खू), प्रमोद जानकीराम भुजबळ रा.धानोरा (भू), बालाजी नारायण जाधव रा. चोंडी यांच्या नावांचा समावेश आहे. तर लोहा तालुक्यातील मात्र दक्षिण नांदेड मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खरबी येथील प्रभाकर नामदेव पवार यांच्या वारसास नांदेड दक्षिणचे आ.आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते लवकरच धनादेशाचे वाटप करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, नायब तहसीलदार अशोक मोकले, राजेश पाठक, तलाठी भुमेश्वर विभुते, विभाग प्रमुख दीपिका डहाळे, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले सह मराठा समाजातील बहुसंख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments: