इचलकरंजीत चेतक गाडीला अचानक आग, नागरिकांमध्ये चिंता.
इचलकरंजीत चेतक गाडीला अचानक आग, नागरिकांमध्ये चिंता.
--------------------------------
सलीम शेख
--------------------------------
इचलकरंजी : शहरातील डेक्कन मिल समोरील रस्त्यावर आज दुपारी चेतक दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे दुचाकी वाहनांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अचानक लागणाऱ्या आगीमुळे वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, वाहनांची तपासणी व देखभाल नियमितपणे करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वाहतूक विभागाकडून सूचना अपेक्षित, या घटनेनंतर वाहतूक विभागाकडून दुचाकी वाहनधारकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ही घटना नागरिकांसाठी एक इशारा ठरू शकते. सुरक्षितता हीच प्राथमिकता!
Comments
Post a Comment