कोल्हापूरमध्ये अवैध हातभट्टी दारूवर छापा – ३.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त.
कोल्हापूरमध्ये अवैध हातभट्टी दारूवर छापा – ३.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त.
-------------------------------
नामदेव भोसले
-------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांनी अवैध दारू तयार करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. कंजारभाट वसाहत साईनगर, कणेरीवाडी, मोरेवाडी (कोल्हापूर) आणि माणगाववाडी (ता. हातकणंगले) या भागांमध्ये छापे टाकून ३,२१,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पोलिस निरीक्षक श्री. रवींद्र कमळकर यांच्या नेतृत्वाखाली छापेमारी करत हातभट्टीद्वारे तयार करण्यात येणाऱ्या दारूचा साठा जप्त करण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ३४०० लिटर कच्चे रसायन, ९०० लिटर तयार रसायन, ४७० लिटर गावठी दारू, तसेच एक अॅक्सीडेंट मोपेड आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. या अवैध व्यवसायात सहभागी असलेल्या ५ महिला आणि ११ पुरुष आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातभट्टीद्वारे तयार होणाऱ्या दारूमुळे समाजावर विपरीत परिणाम होत असून, अशा अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

No comments: