गड मुडशिंगी येथे भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा.
गड मुडशिंगी येथे भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा.
-----------------------------------
शशिकांत कुंभार
-----------------------------------
दि.31 आँगस्ट हा भटके विमुक्त दिवस साजरा करीत असुन राष्ट्रीय स्तरावर OBC असलेल्या या भटक्यांच्या जीवनात क्रांती होवो,पिढ्यानपिढ्याचे सामाजिक मागासलेपण नष्ट होवो, भटकंतीच्या फे-यातून मुक्ती मिळो.
भटक्यांची नोंद घेणारे त्यांच्या भल्यासाठी योगदान देणारे,कायदा करणाऱ्या
डाँ.बाबासाहेब आंबेडकर,ब्रिटिश अधिकारी स्टार्ट,न्यायमूर्ती काकासाहेब कालेलकर,
दिवंगत माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग,न्या.बी.पी.मंडल
यांच्या योगदानाची सुर्य आणि चंद्र असेपर्यंत भटक्यांना आठवण राहील.
भटक्यांचे यातनामय,संघर्षमय जीवन आणि मरण प्रत्यक्ष पाहुन कागदावर नोंद घेतांना आसवांची टीपूस पडलेली अनेकांनी पाहिली होती.त्यांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक मागासलेपण दुर करण्यासाठी त्यांना केवळ आरक्षणाच्या माध्यमातून संधी देता येईल.सरकारने तयार केलेल्या योजना भटक्यांच्या वाडी,वस्ती, तांड्यावर केंव्हा पोहचेल माहिती नाही मात्र त्यांना तातडीने आरक्षण दिले पाहिजे यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात कलम 340 निर्माण केले होते.
त्या ऋणाचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे भटके विमुक्त दिवस होय भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना शासनाचा सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन सेना करवीर तालुक्याच्या वतीने शासन दरबारी प्रयत्न करणार आहे असे उदगार रिपब्लिकन सेनेचे करवीर तालुक्याचे अध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्जुन कांबळे यांनी केले
त्यावेळी उपस्थित
तानाजी काळे जिल्हा संघटक रिपब्लिकन सेना, अर्जुन गोंधळी करवीर महासचिव, सर्जेराव सावंत, दीपक डोणे,बाळू पोवार, रवी चव्हाण, संगीता पोवार, पूजा पोवार, विकास पोवार, आरती पोवार, शाम चव्हाण, सुनिता चव्हाण, निवृत्ती चव्हाण, विशाल चव्हाण, दातू पोवार, विकास पावोर,आनंद पोवार, मंगला चव्हाण, मनीषा चव्हाण, रावसाहेब चव्हाण, शिवराम चव्हाण, हौसा शिंदे, रोशन चव्हाण व भटकीय मुक्त जाती जमाती मधील नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment