Header Ads

कोतोलीत अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड५ इसमांकडून ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

 कोतोलीत अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड५ इसमांकडून ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

----------------------------------

कोतोली प्रतिनिधी

----------------------------------

पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत तब्बल ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोतोलीतील हिंदुस्थान ढाबा येथे छापा टाकून ही कारवाई केली.


पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड, जुगार साहित्य, मोबाईल फोन असा एकूण ३,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान शशिकांत श्रीपति चव्हाण (रा. कोतोली), यशवंत विठ्ठल पाटील (रा. कोतोली) यांच्यासह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे.


ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक श्री. बी. श्रीनिवास, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अंकित मोरे तसेच सहकारी पोलिस कर्मचारी यांनी ही धाड टाकली.


गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी अशा अवैध जुगार अड्ड्यांवर सतत लक्ष ठेवले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.