लोह्यातील दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना ; जैन समाजातून तीव्र निषेध.

 लोह्यातील दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना ; जैन समाजातून तीव्र निषेध.

----------------------------------

लोहा, प्रतिनिधी

अंबादास पवार 

----------------------------------

               लोहा शहरातील देऊळ गल्ली भागात असलेल्या वृषभनाथ दिगंबर जैन मंदिरात दि. १० रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आतील दानपेटी फोडून त्यातील अंदाजे ४४ हजार किमतीचे २ किलो चांदीचे दागिने व ३५ हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. सदरील घटनेप्रकरणी जैन मंदिराचे विश्वस्त यांनी लोहा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

               मागील काही दिवसांपासून लोहा शहरात चोरांच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. शहरातील शिवकल्याण नगर भाग परिसरालगत असलेल्या नूतन वसाहतीत घरासमोर ठेवलेली मोटारसायकल चोरट्यांनी पळवली होती. त्यानंतर दि. १० रोजी बुधवारी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान अद्यात चोरट्यांनी बिडवई नगरातील वृषभनाथ दिगंबर जैन मंदिरात कुलूप तोडून आत प्रवेश करत आतील कपाट फोडून तसेच दानपेटी फोडून त्यातील नगदी पन्नास हजाराची रोख रक्कम आणि अंदाजे ४४ हजार किमतीचे २ किलो चांदीचे दागिने व दान पेटीतील ३५ हजाराची रोख रक्कम लंपास केले. सदरील घटना जैन समाजातील नागरिकांच्या लक्षात येताच जैन मंदिर परिसरात जैन बांधवांनी गर्दी केली. घटनास्थळास लोहा पोलिसांनी भेट देऊन पहाणी केली. तसेच श्वान पथकाने चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाल्याचे समजते. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे देखील चोरीची घटना त्याच रात्री घडल्यामुळे लातूर स्थागुशाचे पथक लोह्यात येऊन पाहणी करून गेले.

          सदर घटनेप्रकरणी जैन मंदिराच्या विश्वस्ताने लोहा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.