Header Ads

भाग्योदय गणेश मंडळ, हाळभाग (ता. वाळवा, जि. सांगली)गणेशोत्सवानिमित्त शिवकन्या साईशाताई दिग्विजय पाटील यांचे व्याख्यान.

 भाग्योदय गणेश मंडळ, हाळभाग (ता. वाळवा, जि. सांगली)गणेशोत्सवानिमित्त शिवकन्या साईशाताई दिग्विजय पाटील यांचे व्याख्यान.

-------------------------------

रजनी कुंभार.

-------------------------------

कोल्हापूर - भाग्योदय गणेश मंडळ, हाळभाग येथे गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यानकार, लहान वयात “शिवशंभू व्याख्याते” म्हणून उदयास आलेल्या आणि महाराष्ट्राने “शिवकन्या” म्हणून गौरवलेल्या साईशाताई दिग्विजय पाटील (वय १३, कोल्हापूर) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


या व्याख्यानामध्ये साईशाताईंनी आपल्या प्रभावी वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास जिवंत उभा केला. त्यांच्या उगवत्या वाणीच्या ओघात श्रोते जागेवर खिळून राहिले. मध्येच पावसाची सर आली तरीही कोणी जागेवरून उठले नाही, इतके प्रभावी व्याख्यान झाले.


कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करताना माजी जिल्हा परिषद सदस्य पुजारी मॅडम म्हणाल्या : “अवघ्या १३ व्या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जसाच्या तसा आपल्या वाणीने प्रकट करणे हे मोठ्या वक्त्यांनाही शक्य नाही. खरंच एवढं काम या वयात करून दाखवणे ही मोठी गोष्ट आहे. पुढचा जन्म असेल तर साईशाताईंच्या पोटी मेळावा”. या उद्गारांवर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी आवर्जून नमूद केले की, “साईशाला तिच्या वडिलांनी हिऱ्यासारखी घडवले आहे.”


यानंतर श्री. शंकर थोरात यांनी साहित्याचे गोड कौतुक करताना सांगितले की, “प्रत्येकाच्या घरी शिवकन्या साईशासारखी मुलगी असावी. कारण मुलगी ही घराचे घरपण सांभाळते व घराण्याचे नाव मोठे करते.”


त्यानंतर सागर माळी यांनी शिवकन्या साईशाताईंच्या व्याख्यानरूपी सेवेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमाची उत्कृष्ट व्यवस्था भाग्योदय गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केली होती. महिला वर्गणीनेही शिवकन्येचे कौतुक केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळखपर भाषण श्री. अनुप आनंदराव वीर सर यांनी केले. आभार प्रदर्शन करताना वीर सर म्हणाले की, “साईशा पाटील यांचे व्याख्यान केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण भारतभर व्हावे” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.


या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. सागर मोटे, उपाध्यक्ष श्री. सागर माळी, सदस्य सत्यजित मोटे, पृथ्वीराज मोटे, युवराज मोटे, विक्रम मोटे, विशाल शिंदे, अभिजीत भिलार, मनोज माळी, सचिन माळी, अक्षय मोटे, श्रीहरी माळी, ओंकार मोटे, आयुष माळी, संग्राम माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.