श्री सुरेश बापुसो पाटील (आप्पा) अंबप वाहनधारक नागरी सहकारी पतसंस्था अंबप या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
श्री सुरेश बापुसो पाटील (आप्पा) अंबप वाहनधारक नागरी सहकारी पतसंस्था अंबप या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
------------------------
किशोर जासूद
------------------------
*सभेस प्रमुख पाहुणे श्री. महादेव तेली बँक निरीक्षक के. डी. सी सी बँक कोल्हापूर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अंबपचे माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील होते. संस्थेचे मार्गदर्शक संचालक व श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहाचे अध्यक्ष अँड. राजवर्धन पाटील (साहेब)यांनी माहिती सांगितली ती पुढील प्रमाणे संस्थेची वार्षिक उलाढाल ३८ कोटी ७ लाख, ठेवी ११ कोटी ६९ लाख, कर्जे ९ कोटी ९ लाख, गुंतवणूक ४ कोटी ४४ लाख, सर्व प्रकारचे फंड १ कोटी ८१ लाख,भाग भांडवल ३४ लाख २६ हजार, निव्वळ नफा १६ लाख ८२ हजार झाला आहे. दीपावली निमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप, नागनाथ यात्रेनिमित्त सभासदांना डीव्हीडंट १० टक्के रक्कम रुपये ३ लाख ४२ हजार वाटप करणार असल्याचे माहिती दिली. मुदत बंद ठेवीवरती ९ टक्के व्याजदर, जेष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जादा व्याजदर, दाम दुप्पट ठेव ९१ महिने, जमीन तारण कर्ज १३ टक्के, घर तारण कर्ज १३ टक्के, वाहन कर्ज १३ टक्के, सोनेतारण कर्ज १२ टक्के व्याजदर असल्याचे सांगितले. संस्थेचे चेअरमन सोमराज पाटील यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. सभेचे अध्यक्ष डॉक्टर बी.के.पाटील, प्रमुख पाहुणे महादेव तेली यांनी मनोगत व्यक्त केले.*
*स्वागत संस्थेचे व्हा. चेअरमन पी.एस. लोकरे सर यांनी केले. अहवाल वाचन व नोटीस वाचन संस्थेचे सेक्रेटरी स्वरूप कार्वेकर यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत निवड झालेले , सेवानिवृत्त झालेले व ज्येष्ठ नागरिक शंकर माळी, तुकाराम माळी, श्रीपती हिरवे, श्रीपती दाभाडे, सर्जेराव जाधव,वैशाली भोरडे, समर्थ घेवारी, मनस्वी माळी, शिवप्रसाद माळी, शशिकांत पाटील, जनार्दन कापसे, लेखापरीक्षक एस. आर. चिंडक यांचा सत्कार प्रमुख पाहुणे व संचालक यांच्या हस्ते करण्यात आला. आभार संस्थेचे संचालक श्री नागेश घेवारी यांनी मानले व सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी संचालक आण्णासो पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, संतोष माळी, महादेव शिंदे, अनिल शिंदे, भीमराव वाघमोडे, कृष्णात गायकवाड, शहाजी दाभाडे, नेताजी कांबळे, शुभांगी उंडे, नंदा दाभाडे, नागेश घेवारी, विक्रम जाधव, शशिकांत पाटील, महादेव वाघमोडे, अंबपवाडीचे गावचे युवा नेते सागर चोपडे, सुदाम पाटील, दादासो पाटील, वसंत पाटील, जालिंदर पाटील, हिंदुराव मुळीक, ज्ञानदेव डोंगरे, प्रदीप पाटील, शिवाजी वाघमोडे, मिलिंद थोरात, दिलावर बेडग, वसंतराव विभुते, मारुती माळी, प्रकाश डोंगरे, सूर्यकांत सुतार, शशिकांत जंगम, आशितोष उंडे, गणेश जाफळे, प्रमोद कांबळे, निलेश दाभाडे, श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूह मधील सर्व संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते*.
Comments
Post a Comment