गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू.
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू.
---------------------------------
मलकापूर प्रतिनिधी
रोहित पास्ते
---------------------------------
गणपती विसर्जनासाठी गावाकडे आलेल्या 31 वर्षीय तरुणाचा पाझर तलाव, पठाराचा वाडा (ता. शाहूवाडी) येथे बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
आनंद काळू झोरे (वय 31, रा. येळवण जुगाई, पठाराचा वाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजण्याच्या सुमारास पाझर तलावात ते बुडाले. घटनास्थळावरून प्रेत 3 सप्टेंबर रोजी सकाळी 2 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.
त्यांच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. आनंद झोरे हे मुंबई येथे नोकरीस होते. गणेश विसर्जनासाठी गावाकडे आले असता ही दुर्घटना घडली.
शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. या घटनेचा तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे हणमंत कुंभार करत असून पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment