जयसिंगपूरात बोगस डॉक्टर व मेडिकलमधून गर्भपात किटचा पुरवठा? बेकायदेशीर कारभारावर नागरिक संतप्त; चौकशीची मागणी.
जयसिंगपूरात बोगस डॉक्टर व मेडिकलमधून गर्भपात किटचा पुरवठा? बेकायदेशीर कारभारावर नागरिक संतप्त; चौकशीची मागणी.
-----------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
-----------------------------------
जयसिंगपूर
गर्भलिंग-निदान प्रकरणामुळे उचललेली खळबळ अजून शांत होण्याआधीच जयसिंगपूरातून नवा धक्कादायक मुद्दा समोर आला आहे. शहरातील पाटील, डिग्रजे व इतर हॉस्पिटल्समध्ये तसेच काही मेडिकलमधून बेकायदेशीररित्या गर्भपातासाठी औषधांची “किट” पुरवली जात असल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, “पाटील बाई” नावाची एजंट या संपूर्ण रॅकेटमध्ये प्रमुख भूमिका बजावत असून, तिच्यामार्फत काही बोगस डॉक्टर व फार्मासिस्ट महिलांशी संपर्क साधतात. गर्भलिंग-निदानानंतर इच्छुक महिलांना सुमारे २० हजार रुपयांत औषधांची किट दिली जाते, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणामुळे शहरातील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
“जिल्ह्यात सतत कारवाया सुरू आहेत, तरी जयसिंगपूरातील बेकायदेशीर कारभारावर अजूनही लगाम का नाही?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
काही सामाजिक संघटनांनी “तातडीने चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी” अशी मागणी केली आहे.
या गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी नागरिकांनी आरोग्य विभाग, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्याकडून संयुक्त कारवाईची मागणी केली आहे. “बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्या हॉस्पिटल्स, मेडिकल्स आणि एजंटांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत” अशी मागणी होत आहे.
गर्भलिंग-निदान आणि बेकायदेशीर गर्भपातामुळे मुलींच्या संख्येत घट होत असून, समाजातील समतोल बिघडत चालला आहे. महिला कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, “अशा प्रथांना आळा बसला नाही तर पुढील पिढीला भयावह परिणामांना सामोरे जावे लागेल.”
जयसिंगपूर हे या बेकायदेशीर प्रकरणांचे केंद्रबिंदू असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. नागरिकांचे लक्ष आता प्रशासन कितपत तातडीने आणि कठोर पावले उचलते, याकडे लागलेले आहे.
No comments: