Header Ads

गणेशोत्सवात दुधगावात शिवकन्या साईशाताईंच्या ज्वलंत व्याख्यानातून शंभूराजांचा इतिहास जागा.

 “गणेशोत्सवात दुधगावात शिवकन्या साईशाताईंच्या ज्वलंत व्याख्यानातून शंभूराजांचा इतिहास जागा.

-------------------------------

दुधगाव प्रतिनिधी 

-------------------------------

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विक्रम सिंह कला व क्रीडा मंडळ आयोजित व्याख्यानात अवघ्या १३ व्या वर्षी “शिवकन्या” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईशाताई दिग्विजय पाटील यांनी धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा ज्वलंत इतिहास प्रभावी शब्दांत मांडला. त्यांच्या ओजस्वी व्याख्यानाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


साईशाताईंनी सुरुवातीला स्पष्ट संदेश दिला की :

“प्रत्येक घरात शिवराय घडवायचे असतील तर प्रत्येक घरात जिजाऊ घडल्या पाहिजेत.”

तसेच तरुणांना उद्देशून त्यांनी व्यसनमुक्ती, स्त्रियांचा आदर, गडकोट संवर्धन, आणि आत्महत्येसारख्या पळपुटेपणाला नकार देण्याचे आवाहन केले.

त्या ठामपणे म्हणाल्या :

“आता रडायचं नाही, आता लढायचं! कारण आपण शिवरायांचे मावळे आहोत.”


यानंतर शंभूराजांच्या बलिदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या :

“३९ दिवसांच्या छळानंतरही ते झुकले नाहीत; त्यांच्या बलिदानामुळेच हिंदवी स्वराज्य टिकले.”

यावेळी “शिवशंभू”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.


शेवटी साईशाताईंनी जाहीर केले की आगामी वर्षी महाराणी ताराराणींच्या पराक्रमावर विशेष व्याख्यान घेऊन येणार आहेत.

प्रसाद हवालदार व दीपक आडमुठे यांनी मनोगतात साईशाताईंच्या प्रभावी सादरीकरणाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आभार शुभम गवळी यांनी मानले.


आयोजक मंडळ : विक्रम सिंह कला व क्रीडा मंडळ, दुधगाव

अध्यक्ष : सचिन मोरे | उपाध्यक्ष : दिशांत गवळी | खजिनदार : प्रसाद हवालदार

No comments:

Powered by Blogger.