जयसिंगपूरमध्ये गणेशोत्सवात आदर्श उपक्रम – सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ.
जयसिंगपूरमध्ये गणेशोत्सवात आदर्श उपक्रम – सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ.
---------------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधि
---------------------------------------
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी गणेशोत्सव सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मंडळाने पंधरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक आदर्श निर्माण केला. या प्रकल्पाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना श्री. हाके म्हणाले, “गणेशोत्सव केवळ ध्वनीप्रदूषणात न साजरा करता सामाजिक कार्यातून आदर्श घालून द्यावा, यासाठीच पोलीस प्रशासन वेळोवेळी आवाहन करत होते. मंडळाने त्यास प्रतिसाद देत नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्प राबवून दिशादर्शक कार्य केले आहे.”
मंडळाचे संस्थापक विनायक गायकवाड म्हणाले की, मंडळ पुढे देखील समाजोपयोगी कार्ये राबवेल. बंद अवस्थेत असलेल्या कुपनलिकांची दुरुस्ती करून नागरिकांना पाण्याची सोय करणे, अशा उपक्रमांचाही समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नांदणी रोड,जयसिंगपूर कॉलेज गेट,मालू हायस्कूल गेट,
छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ चौक,ए.बी.एस. बॉईज मित्र मंडळ,५२ झोपडपट्टी,कलावंती मंदिर शिवसागर कॉलनी,काडगे मळा,श्री महालक्ष्मी मंदिर, शाहूनगर,चाँदतारा मशीद ,रामनगर,, अवचितनगर आदी
उद्घाटन सोहळ्यास संभाजी मोरे, बजरंग खामकर, संजय सुतार, योगेश बलदवा, सरदार कांरडे, बाळासाहेब गावढे, अरुण लाडवडे, रमेश गायकवाड, प्रकाश दत्तवाडे, विठ्ठल रजपूत, सुजित काळे, अमर माने, नितीन देसाई, अजित पवार, पवन भंडारे यांच्यासह मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment