Header Ads

आबासाहेब भोगावकर हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन.

 आबासाहेब भोगावकर हायस्कूलमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन.

--------------------------------------

बाजार भोगाव प्रतिनिधि

 सुदर्शन पाटील 

--------------------------------------

 “विद्यार्थ्यांना ज्ञानसंपादनासाठी केवळ मोबाईल, टॅब किंवा संगणक पुरेसे नाहीत; त्यासाठी मेहनत, चिकाटी आणि जिज्ञासा आवश्यक आहे. शाळेतूनच वाचनाची आवड, प्रश्न विचारण्याची सवय आणि समर्पण जोपासले, तर भविष्यात स्पर्धा परीक्षेत यश नक्की मिळेल,” असे प्रतिपादन एस. एस. राजेभोसले यांनी केले.


येथील आबासाहेब भोगांवकर हायस्कूलमध्ये सरलादेवी भोगांवकर स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र व व्यायामशाळेचे उद्घाटन स्पर्धा परिक्षेतील तज्ञ एस. एस राजे भोसले यांच्या हस्ते झाले. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर टॅलेंट असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते नक्कीच यशस्वी होतील. नोकरी मिळवण्यासाठी या केंद्राचा लाभ घ्यावा,” असे संस्थाध्यक्ष उमेश भोगांवकर यांनी सांगितले.


या प्रसंगी मुख्याध्यापक उत्तम पाटील, पर्यवेक्षक सुनिल नलवडे, पोलिस पाटील छाया पोवार, पत्रकार धनाजी गुरव यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एस. पाटील यांनी केले. प्रास्ताविक एस. बी. बाडे यांनी तर आभार सौ. एस. एम. पवार यांनी मानले.


फोटोओळ – बाजारभोगाव : सरलादेवी भोगांवकर स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उद्घाटनप्रसंगी बोलताना एस. एस. राजेभोसले. शेजारी उमेश भोगांवकर व मुख्याध्यापक उत्तम पाटील.

No comments:

Powered by Blogger.