कुंभोज दुर्गेवाडी परिसरात घरगुती गणरायाला भावपूर्ण निरोप.
कुंभोज दुर्गेवाडी परिसरात घरगुती गणरायाला भावपूर्ण निरोप.
---------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
---------------------------------
– कुंभोज गावातील दुर्गेवाडी परिसरात घरगुती गणपती विसर्जनाचा कार्यक्रम भक्तिभावात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. गणेश चतुर्थीपासून घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात आणि गजरात निरोप देण्यात आला.
घराघरातून “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात बाप्पांचे विसर्जनासाठी नेण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फुग्यांनी सजवलेले रस्ते, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.
परिसरातील नागरिकांनी पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन घरच्या घरी किंवा तलावात केले. काही नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने पाण्यातील मूर्तींची पूजन करून विसर्जन केले. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
स्थानिक मंडळांनी आणि पोलिस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीसाठी योग्य ती व्यवस्था केली होती. सुरक्षिततेसाठी स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
गणरायाच्या आगमनाने जो आनंद गावात पसरला होता, त्याच उत्साहात आणि भावनेने बाप्पाला निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर येण्याचं साकडं घालत, कुंभोजच्या दुर्गेवाडीतील घरगुती बाप्पांचे विसर्जन शांततामय आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment