तांब्याचे बंब चोरणाऱ्याला अटक, १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
तांब्याचे बंब चोरणाऱ्याला अटक, १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
--------------------------
शशिकांत कुंभार.
--------------------------
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलिसांनी तांब्याचे बंब चोरी करणाऱ्या एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चोरीला गेलेले पाच तांब्याचे बंब आणि एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर, २०२५ रोजी कोपर्डे येथील रहिवासी रणजित पाटील यांच्या घराजवळून एक तांब्याचा बंब चोरीला गेला होता. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला तात्काळ पकडण्यात आले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने आणखी चार तांब्याचे बंब चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले पाचही बंब आणि चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस हवालदार सुभाष सरवडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
No comments: