Header Ads

पन्हाळा तालुक्यातील कोतोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ५ जण ताब्यात.

 पन्हाळा तालुक्यातील कोतोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ५ जण ताब्यात.

------------------------------

 शशिकांत कुंभार 

------------------------------

कोतोली ता. पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोतोली येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या छाप्यात पोलिसांनी प्रकाश हिंदुराव लव्हटे, संदीप नामदेव लव्हटे, सर्जेराव श्रीपती मेंगाणे, दीपक शिवाजी गवळी आणि समर्थ पांडुरंग पाटील (सर्व रा. कोतोली) यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख २२,५०० रुपये, पाच मोबाईल हँडसेट, पाच दुचाकी आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.

या सर्व आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.