तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने पटकावला प्रथम क्रमांक.
तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने पटकावला प्रथम क्रमांक.
--------------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------------
शाहूवाडी : न्यू इंग्लिश स्कूल सावे या ठिकाणी झालेल्या विज्ञान नाटिका स्पर्धा विस्तार अधिकारी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये पार पडल्या .या स्पर्धेमध्ये 9 संघाने भाग घेतला होता या मध्ये न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळने प्रथम क्रमांक पटकावला अजून जिल्हास्थरीय निवड झाली आहे . न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेचे विज्ञान शिक्षक श्री संभाजी बाडे यांनी लेखन व दिग्दर्शित केलेल्या डिजिटल भारत जीवनसक्षमीकरण या विषयावरील प्रगत भारत या नाटिकेमध्ये पायल कांबळे, साहिल वरंडेकर ,सुरज चिले, अवधूत पाटील,आऐशा शेख, समृद्धी सावंत,सानवी रासम, विघ्नेश कांबळे या विद्यार्थ्यांनी मुख्य भूमिका पार पाडल्या तसेच अनुराधा पाटील हिने सुरपेटी अर्णव पाखरे पुनाळ याने ढोलकी पवन शिंदे चाळ अवधूत के पाटील यांनी दिमडी असे वाद्य वाजवले आदित्य पाटील सर्वेश पाटील शुभम कांबळे यांनी स्टेज चे व्यवस्थापन पाहिले या नाटकेमध्ये साहिल वरंडेकर याला उत्कृष्ट कलाकाराने सन्मानित करण्यात आले. या नाटकेसाठी मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे संस्थेचे संस्थापक, पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक एन एन कळोंलीकर सर यांचे तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आजूबाजूच्या परिसरातून विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक होत आहे
Comments
Post a Comment