मरळी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद -२ संपन्न.
मरळी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद -२ संपन्न.
------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
--------------------------------
कळे:- पन्हाळा तालुक्यातील मरळी येथील नवोदय माध्यमिक विद्यालय येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद-२ उत्साहात पार पडली. या परिषदेसाठी कळे केंद्रामधील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते. या परिषदेस विद्यामंदिर मरळी चे मुख्याध्यापक प्रकाश अस्वले यांनी अध्यक्षस्थान भूषविले.तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या मंदिर घरपण चे मुख्याध्यापक भीमराव ठाणेकर हे होते. केंद्र समन्वयक विजय फासे यांनी एक भारत श्रेष्ठ भारत अध्ययन निष्पत्ती व इतर विषयांवर मार्गदर्शन केले. सागर हंबर यांनी मार्गदर्शक म्हणून काही सूचना, मागील परिषदेचा आढावा घेतला त्यानंतर माधवी पाटील यांनी विषय नवोपक्रम वर माहिती दिली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवोदय माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका वैशाली पाटोळे यांनी केले तर आभार शिक्षक राजाराम पाटील यांनी मानले.
कोल्हापूर विभाग.
Comments
Post a Comment