हिंगणगाव रण झुंजार गणेश मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन-लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील.

 हिंगणगाव रण झुंजार गणेश मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन-लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील.

---------------------------------

कुंभोज प्रतिनिधी

विनोद शिंगे

---------------------------------

हिंगणगाव येथील रण झुंजार गणेश मंडळाच्या वतीने मंडळाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.


कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल जमादार, सचिव अविनाश माने, आशा गट प्रवतक पुनम माळी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि अनेक आरोग्य सेवक उपस्थित होते. यावेळी हिंगणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुष्यमान भारत काडचे वाटप लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देहदान फॉर्म भरून घेण्यात आले.


शिबिरात सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, नेत्रतपासणी यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेकांनी या सेवांचा लाभ घेतला.


झुंजार गणेश मंडळ गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, यावर्षीचा वर्धापन दिन हा सामाजिक जाणीवेतून साजरा करण्यात आल्याने मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन महावीर पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.