कसबा ठाणे येथे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन.
कसबा ठाणे येथे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन.
कसबा ठाणे येथे संकल्प युवा फौंडेशन यांच्या वतीने सलग 8 व्या वर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन व निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमास कसबा ठाणे व महाडिकवाडी येथील गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 102 गणेश मूर्तींचे विसर्जन हे नदीमध्ये न करता गावातील पर्यावरणपूरक खणीत गणेश विसर्जन केले. या उपक्रमात फौंडेशनचे सदस्य, प्रशांत पाटील, नामदेव पाटील, सागर बा.पाटील, वैभव मोळे, सागर वि.पाटील, शुभम मेडसिंग, मनोहर मरळकर, विजय पाटील सर,राहूल पाटील, उमेश मेडसिंग इ. तसेच सर्व सभासद आणि गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment