सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत टाळ व ढोलकीचे वर्चस्व.

 सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत टाळ व ढोलकीचे वर्चस्व.

---------------------------------

शाहुवाडी प्रतिनिधी 

आनदा तेलवणकर

---------------------------------

शाहुवाडी तालुक्यातील कांटे तरुण मंडळांनी दिला डॉल्बीला फाटा   महिलांनी धरले झिम्मा फुगडी चे फेर 

 कांटे येथील गोल्डन ग्रुप व टायगर इलेवन ग्रुप या गावांमधील सार्वजनिक मंडळांनी विघ्नहर्त्याचे विसर्जन भक्तीमय वातावरणात केले. शाहुवाडी पोलीसांनी  केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत  व गावात घडलेल्या घटनेमुळे सिस्टीमविरहित मिरवणुका काढण्यात आल्या.


कांटे येथील  गोल्डन ग्रूप व टायगर इलेवन ग्रूप यांची चार तास चाललेली मिरवणूक विशेष आकर्षण ठरली.  हरी नामाचा गजर   टाळ ढोलकीच्या गजरात धरलेले रिंगण व महिलांनी धरलेल्या झिम्मा-फुगडीच्या फेरामुळे मिरवणुकीला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते .  


गणपती विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडावी म्हणून पोलिस निरीक्षक  विजय घेरड यांच्या मार्गदर्शनाखाली व बिट अंमलदार कुंभार यांच्या मार्गदशना कांटे येथील पोलीस पाटील जगदीश पाटील  कांटे व बुरंबाळ येथील लक्ष देवून होते

 चौकट

 मागील काही वर्षांपासून सार्वजनिक  गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये  डीजेची संस्कृती वाढीस लागली होती त्यामुळे ढोल-ताशा लेझीम हालगी यासारख्या पारंपारिक वाद्यांचा विसर पडला होता  मात्र यावर्षी  ग्रामीण भागातील  काही तरूण मंडळांनी कर्णकर्कश  डॉल्बीला फाटा देत टाळ मृदंग ढोल ताशा च्या  गजरात गणपती  विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत  तसेच कांटे येथील तरूण मंडळानी डॉब्ली साठी होणारा खर्च टाळून टाळ ढोलगीच्या गजरात ठेका धरला  या साठी मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे गोल्डन ग्रूप चे अध्यक्ष विठ्ठल पाटील  , पांडुरंग चव्हाण, रामभाऊ पाटील, ज्ञानदेव तराळकर, नामदेव तराळकर, सागर पाटील, सहदेव साळोखे

टायगर इलेव्हन अध्यक्ष सुरेश पाटील , हरीष पाटील, महादेव साळोखे, अमर पाटील, धिरज खामकर, संजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.