एकीकडे सज्जनगड परळी येथील ग्रामस्थानी पर्यावरण पूरक गणपती विसर्जन केले तर दुसरीकडे साताऱ्यातुन आलेल्या नागरिकांच्या कृतीतून विरोधाभास दिसून आला.
एकीकडे सज्जनगड परळी येथील ग्रामस्थानी पर्यावरण पूरक गणपती विसर्जन केले तर दुसरीकडे साताऱ्यातुन आलेल्या नागरिकांच्या कृतीतून विरोधाभास दिसून आला.
-----------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-----------------------------------------
सज्जनगड परळी हे सातारा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव- उरमोडी धरण उशाशी असणारे आणि उत्तरेस शंभर मिटरच्या वर्तुळात उरमोडी नदी असे हे सर्वसोयीयुक्त असे गाव.पाच दिवसानंतर बहुतांश घरातील गणपती बाप्पाचे पारंपरिक विसर्जन हे होत असते. ते विसर्जन हे पर्यावरण पूरक करण्याचा उपक्रम परळी येथील ग्रामस्थानी पार पाडला. ग्रामपंचायत सरपंच- बाळासाहेब विठोबा पाटील तसेच ग्रामसेवक-नितीन पवार यांच्या मार्गदर्शनात उपसरपंच - समीर आसिफ मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य -शेखर गोकुळ जांभळे,आणि अन्य सर्व सदस्य,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी- संतोष नंदकुमार धोत्रे. तसेच परळी गावातील सर्व ग्रामस्थ ह्यांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन कार्यक्रम सोहळा पार पाडला.दुसरीकडे साताऱ्याहून परळीच्या दिशेने गजवडी फाट्यानजीक उरमोडी नदीवर एक पूल बांधण्यात आला आहे त्याठिकाणी सातारहून चारचाकी गाडीतून आलेल्या नागरिकांची गणपती विसर्जनकरिता प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली. एकीकडे गावकाऱ्यांचे पर्यावरन पूरक विसर्जन आणि दुसरीकडे त्याच गावच्या सीमेतून वाहत गेलेल्या उरमोडी नामक नदीपात्रात शहर वासियांचे गणपती विसर्जन हे विरोधाभाशी चित्र पाहायला मिळाले.
Comments
Post a Comment