गणपती विसर्जन मिरवणुकीत रंकाळ्यात पडलेल्या आजींना अग्निशामक दलांच्या जवानांनी दिलं जिवदान.
गणपती विसर्जन मिरवणुकीत रंकाळ्यात पडलेल्या आजींना अग्निशामक दलांच्या जवानांनी दिलं जिवदान.
---------------------------
सलीम शेख
---------------------------
कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जन सुरू असताना, रंकाळा तलावात पडल्या असता अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पाण्यात उड्या मारत त्यांना पाण्यातून बाहेर काढून कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की,
आज, दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणपती विसर्जन काळात रंकाळा परिसरात कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आपले कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी, एका वृद्ध महिला (आजी) अचानक रंकाळा तलावात पडल्या. यावेळी अग्निशामक जवान उदय शिंदे, सुरेंद्र जगदाळे, फायर विद्यार्थी आदिम लाटकर, पार्थ पाटील यांनी आजीला पाण्यातून बाहेर काढण्यास व्हाईट आर्मी च्या साक्षी गोरे व सानिका पवार यांचे सहकार्य लाभले.
पाण्याबाहेर काढल्यावर आजी बेशुद्ध अवस्थेत होत्या, . त्याचवेळी, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही धाव घेत आजींना तातडीने रुग्णवाहिकेतून सीपीआर येथील अपघात कक्षात दाखल केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला. त्यामुळे अग्निशमन दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment