उमळवाड : गावातील माजी उपसरपंच ‘भैय्या’ यांच्या सावकारीप्रकरणावरुन खळबळ.

 उमळवाड : गावातील माजी उपसरपंच ‘भैय्या’ यांच्या सावकारीप्रकरणावरुन खळबळ.

-------------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी

नामदेव भोसले

-------------------------------------

उमळवाड गावातील माजी उपसरपंच ‘भैय्या’ यांच्या सावकारी व्यवहाराची चर्चा गावभर रंगली आहे. एका गरीब कुटुंबाला दिलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल १० टक्के दराने व्याज आकारण्यात आले. या कर्जासाठी कर्जदाराकडून कोरा चेक व दुचाकी वाहने जामीन म्हणून घेतली गेली होती.


सात महिन्यांनंतर कर्जदाराने मुख्य रक्कम आणि व्याजाची रक्कम परतफेड केल्यानंतरही सुरक्षित केलेली वाहने परत मिळाल्यानंतर व्यवहार संपला, असे मध्यस्थांनी सांगितले. मात्र, “पैसे अद्याप बाकी आहेत, नाही दिले तर कोरा चेक वटवू” अशी धमकी संबंधित कुटुंबाला देण्यात आली. या प्रकारामुळे संपूर्ण गावात सावकारी प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.


गावात इतर सावकारांकडूनही कर्जदारांची गावे, वाहनं आणि घरगुती साहित्य ताब्यात घेण्याचे प्रकार होत आहेत. कर्जदाराला दिवसभर बदनाम करणे, शिवीगाळ करणे, मानसिक त्रास देणे, मागासवर्गीय युवकांचा वापर करुन दहशत माजवणे असे प्रकार सुरू आहेत.


या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून, बेकायदेशीर सावकारीवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे।

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.