कांटे येथील गौरी गणपती विसर्जन सोहळा शोकाकुल भावनेत पार पडला.

 कांटे येथील गौरी गणपती विसर्जन सोहळा शोकाकुल भावनेत पार पडला.

---------------------------------

शाहुवाडी प्रतिनीधी 

आनंदा तेलवणकर

---------------------------------

   शाहुवाडी : कांटे येथील गौरी सह आपल्या लाडक्या गणरायाला निराशजनक स्वरूपात निरोप देण्यात आला . 

यावेळी कोणत्याही प्रकारची घोषणा तसेच कोणत्याही प्रकारचे वाघ्य वाजवण्यात आले नाही

           कारण गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी कांटे येथील तरूण विश्वास कृष्णात चव्हाण वय वर्षे24 या तरुणाचा लोणावळ्या जवळ अपघात होवून त्याचा मृत्यू झाला होता तर आज गणपती विसर्जनाच्या काही वेळे अगोदर वालुबाई आनंदा चाळके यांचे निधन झाले त्यामुळे गावात शोककळा पसरून गावात शांततामय वातावरण निर्माण झाले होते तसेच गावातील दोन्हीं ही मंडळांनी कोणत्याही प्रकारचे वाद्य किंवा भोंगा लावला नाही तसेच गणरायाचे विसर्जन शांततेत पार पडले यावेळी गावचे पोलीस पाटील जगदीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.