“सरकारी नोकरीच्या आमिषाखाली कोट्यवधींची लूट – तरुणावर जीवघेणा हल्ला”
“सरकारी नोकरीच्या आमिषाखाली कोट्यवधींची लूट – तरुणावर जीवघेणा हल्ला”
-----------------------------
राजु कदम
-----------------------------
कुपवाड (ता. मिरज) – अवधूत कॉलनी, कुपवाड येथे नोकरीच्या आमिषाखाली तब्बल ५ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन आणि ५० हजार रुपये रोख अशा एकूण ६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
बामणोळीतील देवानंद वसगडे हे वृत्तपत्र वाटपाचे काम करतात. त्यांचा मुलगा ओंकार वसगडे याला सरकारी नोकरी लावून देतो, असा विश्वास देत आरोपी अमोल ढोबळे यांनी ही रक्कम घेतली. आरोपींनी रेल्वे किंवा आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतले, परंतु नोकरी मिळाली नाही.
विचारपूस करण्यासाठी वसगडे आरोपींच्या घरी गेले असता वादविवाद वाढला. त्यानंतर द्यानोबा ढोबळे यांनी देवानंद वसगडे यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली; ते गंभीर जखमी झाले असून सध्या उपचाराधीन असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राथमिक चौकशीत या फसवणुकीचा जाळा जवळपास ३ कोटी रुपयांपर्यंत पसरले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेकांनी अमोल ढोबळेकडून अशाच पद्धतीने पैसे दिल्याची शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप गंभीर असून, फसवणूक झालेल्यांनी तत्काळ कुपवाड MIDC पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
घटनेची फिर्याद ओंकार देवानंद वसगडे (रा. बामणोळी) यांनी दिली असून कुपवाड MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

No comments: