डॉ.शगुप्ता मन्सूर मुल्ला यांना संगणक अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी.
डॉ.शगुप्ता मन्सूर मुल्ला यांना संगणक अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी.
------------------------------
अंबप प्रतिनिधी
किशोर जासूद
------------------------------
कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून संगणक शास्त्र व अभियांत्रिकी (CSE) या शाखेत डॉ. शगुप्ता मन्सूर मुल्ला यांनी पीएच.डी.पदवी संपादन केली आहे. त्यांनी मशीन लर्निंग-बेस्ड डेटा ब्रीच इन्व्हेस्टिगेशन फ्रेमवर्क यूजिंग प्रिस्क्रिप्टिव्ह अॅनालिटिक्स” या विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर केला.
या संशोधन कार्याला भारती विद्यापीठ, पुणेचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांचे मोलाचे प्रोत्साहन व प्रेरणा लाभली. तसेच, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. विजय आर. घोरपडे यांचे संशोधन मार्गदर्शक म्हणून वेळोवेळी महत्वाचे मार्गदर्शन लाभले. त्या भारती विद्यापीठ अभियांत्रिकी कॉलेज कोल्हापुर येथे एआयए्मए्ल विभागाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. मुल्ला यांना हे यश मिळविण्यासाठी त्यांच्या पालकांचे व कुटुंबियांचे मजबूत पाठबळ लाभले असून या सर्वांच्या सहकार्यामुळे त्यांनी हे संशोधन कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. यामुळे यांचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत होत आहे
No comments: