मल्हार पेठ मधील कोसळलेल्या घरातील जखमीचा मृत्यु

 मल्हार पेठ मधील कोसळलेल्या घरातील जखमीचा मृत्यु.

-----------------------------

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

-----------------------------

  कळे:- मल्हारपेठ ता. पन्हाळा येथे पावसाने राहते घर अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या रंगराव दत्तू मोरे ( वय 70) या वृद्धाचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला . याबाबत अधिक माहीती अशी 19 ऑॅगस्ट रोजी रात्री 8 वाजता जोरदार पावसाने लगतच्या घराची भिंत रंगराव मोरे यांच्या राहत्या घरावर कोसळून संपूर्ण राहते घर उध्वस्त झाले . घरातील व्यक्ती रंगराव मोरे .राधिका मोरे व समिक्षा कापसे हे तिघे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून जखमी झाले होते . यातील रंगराव मोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते . मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला .त्याच्या पश्चात मुलगा तीन मूली .सुन .नातवंडे असा परिवार आहे .

कोल्हापूर विभाग.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.