Frontline News Maharashtra

कळे विद्यामंदिर माजी विद्यार्थ्यांकडून समाजाभिमुख उपक्रम

No comments :

 कळे विद्यामंदिर माजी विद्यार्थ्यांकडून समाजाभिमुख उपक्रम भेंडाई धनगरवाडा प्राथमिक शाळेत खाऊवाटप व करंजी बी रोपण मोहीम राबवली .

--------------------

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

---------------

कळे विद्यामंदिर कळे माजी विद्यार्थी संघटना प्रणित व गुरुवर्य स्व. आर. व्ही. अष्टेकर सर यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मरळी ( ता. पन्हाळा )  यांच्या वतीने भेंडाई धनगरवाडा (वेतवडे) येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरात तसेच वेतवडे ते भेंडाई धनगरवाडा मार्गावर करंजी बियांची रोपण मोहीम उत्साहात पार पडली. पर्यावरण संवर्धन व विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण या दुहेरी उद्देशाने या उपक्रमास विशेष महत्त्व लाभले. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र बच्चे, उपाध्यक्ष बाजीराव वरपे, सचिव संभाजी दांगट   सदस्य आनंदराव पाटील म्हाळूंगेकर, स्वच्छता कमिटी प्रमुख शरद दंताळ, शिवाजीराव पाटील (कुडित्रे), सुभाष पाटील (वेतवडे), सुरेश मोरे (मोरेवाडी), रामचंद्र देशपांडे (कळे ) यांनी सहभाग घेतला. 


   संस्थेच्या सामाजिक भान जपणाऱ्या कार्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

कोल्हापूर विभाग.

No comments :

Post a Comment