अंबपमध्ये श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकारी दूध उत्पादक संस्थेची ५५ वी वार्षिक सभा उत्साहात.
अंबपमध्ये श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकारी दूध उत्पादक संस्थेची ५५ वी वार्षिक सभा उत्साहात.
--------------------------
किशोर जासूद
--------------------------
अंबप :श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, अंबपची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या श्री बापूसो यशवंत पाटील (अण्णा) सभागृहात मोठ्या खेळीमेळीत पार पडली.
या सभेस डॉ. अशोक पाटील (संकलन अधिकारी व महाव्यवस्थापक, श्री वारणा दूध संघ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहातील सर्व संस्था आदर्शवत कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार काढले.
---
संस्थेची आर्थिक कामगिरी
संस्थेचे चेअरमन अँड. राजवर्धन पाटील यांनी अहवाल सादर करताना सांगितले की,
संस्थेची दूध विक्री : ₹१ कोटी ७९ लाख ८४ हजार
एकूण नफा : ₹१३ लाख ४७ हजार
डिव्हिडंड : १२% जाहीर
वार्षिक उलाढाल : ₹२ कोटी ४५ लाख ६२ हजार
ठेवी : ₹४२ लाख ६१ हजार
गुंतवणूक : ₹१० लाख ९० हजार
राखीव निधी व इतर निधी : ₹६४ लाख ०६ हजार
इतर येणी : ₹३८ लाख ५० हजार
---
शेतकरी हितासाठी योजना
संस्थेमार्फत म्हैस खरेदी अनुदान, चाफ कट्टर खरेदी अनुदान, गाय-म्हैस पशुधन मयत अनुदान, सावित्रीबाई फुले कन्या वाचवा योजना, यशवंत शेतकरी पेन्शन योजना, मुक्त गोठा अनुदान आदी योजना राबवण्यात आल्या.
➡️ यांद्वारे अहवाल वर्षात ₹८ लाख ९९ हजार वितरित करण्यात आले.
➡️ तसेच अंबप ग्रामदैवत श्री नागनाथ यात्रेनिमित्त म्हैस दुधास प्रतिलिटर ₹१ व गाईच्या दुधास ₹०.५० फरक बिल देण्यासाठी ₹४ लाख ७५ हजार तरतूद करण्यात आली आहे.
---
सन्मान व गौरव
सभेदरम्यान अनेकांचा सन्मान करण्यात आला.
जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे उत्पादक : पांडुरंग दाभाडे, शुभम शिंदे, संजीवनी माळी, संभाजी जगताप, स्वाती शिंदे, मारुती जाधव, संतोष सुरवशी, सुशीला पाटील, तुकाराम माळी, राजाका वाघमोडे.
शासकीय/निमशासकीय पदांवर निवड : सुरज आलूगडे, सुभाष कार्वेकर, प्रशांत घेवारी, किशोर वरपे, मधुरा माळी, शिवतेज डोंगरे.
सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव : गजानन कानडे, शरद शेटे, सदाशिव जाफळे, महादेव जाधव.
ज्येष्ठ सभासदांचा सत्कार : बळवंत शिंदे, गौतम कांबळे, कृष्णात कार्वेकर, सूर्यकांत सुतार, महादेव गायकवाड.
शैक्षणिक गुणवंत (एस.एस.सी. मार्च २०२५) : तन्वी चौगुले, वेदांत पाटील, तनुजा पाटील.
---
मान्यवर उपस्थिती
या सभेस डॉ. एन. एस. वडजे, डॉ. बी. के. पाटील, सुरेखा पाटील, ऋतुजा पाटील, सोमराज पाटील, महादेव सूर्यवंशी, लेखापरीक्षक एस. आर. चिंडक, तसेच संचालक दादासो पाटील, वसंत पाटील, राजेंद्र कानडे, विश्वास शिंदे, निजाम मुल्ला, अनिकेत डोंगरे, हिंदुराव कांबळे, सौ. नीता माळी, अश्विनी पाटील, विठ्ठल दाभाडे, अनिता डोंगरे, प्रदीप पाटील (सेक्रेटरी), इतर पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment