जाखले गावात सलग ९ वर्षे पर्यावरणपूरक मूर्तिदान उपक्रम.
जाखले गावात सलग ९ वर्षे पर्यावरणपूरक मूर्तिदान उपक्रम.
--------------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
--------------------------------------
जाखले : गावात सलग नऊ वर्षांपासून मूर्तिदान चळवळ यशस्वीपणे सुरू असून यावर्षीही मोठ्या उत्साहात हा उपक्रम पार पडला. गावातील घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी सार्वजनिक पानवट्याचा वापर न करता प्रत्येक गल्लीमध्येच विसर्जनाची सोय तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली.
या उपक्रमात सरपंच सौ. जयश्री महादेव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळे व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावर्षी साधारण ६२५ गौरी-गणपती मूर्तींचे संकलन करून त्यांचे निर्वात ठिकाणी विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.
या उपक्रमामुळे पाणी प्रदूषण टळून परिसर स्वच्छ राहिला असून, पर्यावरण जनजागृती, समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी व गावकऱ्यांमधील ऐक्य वृद्धिंगत झाले आहे.
या प्रसंगी श्री. राहुल देशमुख सर, कैलास पाटील (वकील), ज्योतीराम पाटील, महादेव देशमुख, वैभव शिंदे तसेच सर्व गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
🌿 जाखले गावचा हा उपक्रम पर्यावरणपूरक व आदर्शवत ठरत आहे. 🌿
Comments
Post a Comment