Header Ads

कुंभोजमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत लाईनसाठी ठेकेदाराची दादागिरी; ग्रामस्थांचा तीव्र विरोध, काम ठप्प.

 कुंभोजमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत लाईनसाठी ठेकेदाराची दादागिरी; ग्रामस्थांचा तीव्र विरोध, काम ठप्प.

************************

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)

*************************

कुंभोज येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी विद्युत पुरवठा लाईन बसवण्याच्या कामात ठेकेदाराकडून ग्रामस्थांवर दबाव आणत जबरदस्ती करण्याचा प्रकार समोर आला आहे. या दादागिरीविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यामुळे सध्या प्रकल्पाचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सौर प्रकल्पासाठी होणाऱ्या विद्युत लाईन टाकण्याचे काम स्थानिकांच्या शेतातून व मालमत्तांजवळून बिनपरवानगी सुरू करण्यात आले. याबाबत कुठलीही पुर्वसूचना न देता ठेकेदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. विरोध करताच ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सौर ऊर्जा प्रकल्प करत असताना कुंभोज व दुर्गेवाडी ग्रामस्थांना केवळ प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी आश्वासने देऊन फसवले असून हा प्रकल्प लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी दबाव टाकून कुंभोज व दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या वरलादत असल्याची चर्चा ग्रामस्थातून होत असून अनेक आंदोलने झाली तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करत असल्याचे चित्र दिसत आहे.


"आमच्या शेतातून व घराजवळून लाईन जाणार असेल, तर आमची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र कुणीही आमच्याशी संवाद साधला नाही. उलट आम्ही प्रश्न विचारल्यावर ठेकेदाराने उर्मटपणे वागणूक दिली," असे दादा पांडव एका यांनी सांगितले.या प्रकारामुळे ग्रामस्थ एकवटले असून, त्यांनी एकमताने प्रकल्पाचे काम बंद पाडले. प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्थानिक प्रशासनाचे गप्प राहणे धक्कादायक

या सर्व प्रकारावर प्रशासन अद्याप मौन बाळगून आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सौर प्रकल्प ही गरजेची बाब असली तरी ग्रामस्थांच्या मालमत्तांचे संरक्षण व विश्वास संपादन करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे, असे मत ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले.या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करायचे असेल, तर ग्रामस्थांशी समन्वय साधून योग्य तो मार्ग काढावा लागेल. अन्यथा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.विनोद शिंगे कुंभोज

No comments:

Powered by Blogger.