ईद ए मिलादनिमित्त 'यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र'चा अभिनंदनीय उपक्रम: राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन.
ईद ए मिलादनिमित्त 'यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र'चा अभिनंदनीय उपक्रम: राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन.
**********************
सुपर भारत -शशिकांत कुंभार
**********************
कोल्हापूर, दि. १४: प्रेषित मुहम्मद जयंती, अर्थात ईद ए मिलादच्या शुभमुहूर्तावर 'यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र' या युवक संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. समाजाप्रती आपली बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमात एकूण ८०५८ नागरिकांनी रक्तदान करून एक नवा आदर्श घालून दिला.
याच उपक्रमाचा भाग म्हणून, कोल्हापूर शहरातही मुस्लिम बोर्डिंग येथे दि. १४ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३८ उत्साही रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. शिबिराला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या सामाजिक कार्याला पाठिंबा दिला.
या यशस्वी आयोजनामागे 'यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष तैहसीन काझी यांचे मार्गदर्शन तसेच मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन श्री. गनी आजरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच, सोहेल जामखंडीकर, निहाल शेख, मुस्तफा बागवान, अरबाज बागवान, उमर मुजावर, इजहारूल पटेल, जैद नांदनीवालां, अशपाक पठान आणि इतर कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
'रक्तदान हे श्रेष्ठ दान' या उदात्त हेतूने प्रेरित होऊन राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Comments
Post a Comment