वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पडल्याने मृत्यू जोगेवाडीत घटना.
वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पडल्याने मृत्यू जोगेवाडीत घटना.
---------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
राधानगरी तालुक्यातील जोगेवाडी येथील शेतकरी शामराव राहटोळ वय, 75 हे जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी शेतात गेले असताना शेतामध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली
या बाबत अधिक माहिती अशी की जोगेवाडी येथील शेतकरी शामराव दत्तात्रय राहटोळ वय 75 हे राहटोळ नावाच्या शेतामध्ये जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गेले होते त्यावेळी वैरणीचा भारा घेऊन येत असताना पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते त्यांना नातेवाईकांनी तातडीने मुदाळ तिट्टा येथील जीवनधारा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी केली असता शामराव राहटोळ हे मयत झाले असल्याचे सांगितले याबाबतची फिर्याद विक्रम अशोक राहटोळ यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिली
याबाबतचा अधिक राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल जठार व कॉन्स्टेबल पाटील हे करीत आहेत
Comments
Post a Comment