उमळवाडात सावकारी प्रकरणाची जोरदार चर्चा – माजी उपसरपंचाचे सदस्यपद धोक्यात?
उमळवाडात सावकारी प्रकरणाची जोरदार चर्चा – माजी उपसरपंचाचे सदस्यपद धोक्यात?
-----------------------------------
उमळवाड प्रतिनिधी
नामदेव भोसले
-----------------------------------
कर्जदार-सावकार संभाषण गावभर चर्चेत; तहसीलदाराच्या निर्णयाकडे लक्ष.
गावातील माजी उपसरपंच खासगी सावकारीच्या बेकायदेशीर व्यवहारात गुंतले असल्याच्या चर्चेने उमळवाडात चांगलीच खळबळ उडाली आहे. १० टक्के व्याजाने घेतलेले पैसे, तारण म्हणून कोरा चेक व दुचाकी, तसेच लाखो रुपये परत केल्यानंतरही धमक्या दिल्याचे संभाषण गावभर चर्चेचा विषय ठरले आहे.
या प्रकरणामुळे आता संबंधित माजी उपसरपंचाचे ग्रामपंचायत सदस्य पद धोक्यात आले आहे. खासगी सावकारी हा बेकायदेशीर व्यवसाय असून, अशा व्यक्तीकडून सार्वजनिक पद भूषवले जाणे ही ग्रामस्थांच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे.
दरम्यान, सावकार व कर्जदारामधील फोनवरील संभाषण गावभर फिरत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. यात धमक्या, उघड तगादा व मानसिक छळ याचे पुरावे असल्याचे सांगितले जात आहे.
“ग्रामपंचायत सदस्य पदावरून कारवाई व्हावी” अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे
तहसीलदारांकडे केली आहे. आता तहसीलदार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment