दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या रांगोळीचे प्रदर्शन.
दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या रांगोळीचे प्रदर्शन.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
कोल्हापूर येथील दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग येथे गणेश उत्सव निमित्त ऑपरेशन सिंदूर च्या विषयावर भव्य रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले असल्याची माहिती सौ सीमा पवार यांनी दिली
गणेश उत्सव निमित्त दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग येथे ऑपरेशन सिंधूर या विषयावर बारा फूट बाय 36 फूट आकारात पहेलगाम येथील भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूर ची रांगोळी प्रदर्शनात पहेलगाम काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यातील पर्यटक त्यांच्या कुटुंबीयांना झालेल्या दुःख भारतीय सैन्य रफेल विमान, शस्त्र ,रॉकेट्स, योमिका सिंह, सोफिया कुरेशी, भारतीय ध्वज, अशोक चक्र, भारताचा नकाशाचे चित्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे
ही रांगोळी बारा फूट बाय 36 फूट रेखाटलेली रांगोळी आंतरराष्ट्रीय रंगवलीकार महेश चंद्रकांत पोतदार त्यांना सहकार्य म्हणून जे डी मोरे सौ चंद्रलेखा वेल्हाळ यांचे सहकार्य लाभले असल्याचे सौ सीमा पवार यांनी सांगितले
Comments
Post a Comment