सराईत गुन्हेगाराकडून गांजा जप्त.

 सराईत गुन्हेगाराकडून गांजा जप्त.

--------------------------

 शशिकांत कुंभार

--------------------------

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शहरात 'मिशन झिरो ड्रग्ज' अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीकडून ३ किलो गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत ७५,००० रुपये आहे.

पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार, अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

पोलिस अंमलदार सत्यजित तानुगडे आणि अरविंद पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिंगणापूर येथील श्रीराम नगर कॉलनीमध्ये एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रोहित मनोज चव्हाण (वय २६, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडतीत ३ किलो गांजा आणि ७५,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान, त्याने हा गांजा मन्सुर शेख (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात रोहित चव्हाण याच्या विरोधात 'नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, १९८५' (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन्सुर शेख फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलिस अंमलदार सत्यजित तानुगडे, प्रविण पाटील, अरविंद पाटील, दिपक घोरपडे, अशोक पोवार, रुपेश माने, सुरेश पाटील, प्रदीप पाटील, अमित सर्जे, शुभम संकपाळ, अनिल जाधव, आणि सतीश सुर्यवंशी यांचा सहभाग होता.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.