अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाऱ्या टिप्परवर स्थागुशा ची कार्यवाही.
अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाऱ्या टिप्परवर स्थागुशा ची कार्यवाही.
-------------------------------
लोहा प्रतिनीधी
अंबादास पवार
-------------------------------
महसूल व पोलिस प्रशासनाकडून सातत्याने अवैध रेती विरुद्ध कार्यवाही होत असताना देखील जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैधरित्या रेती उपसा व वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. रेती माफीयाकडुन चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती स्थागुशाला मिळाल्यावरून टाकलेल्या छाप्यात पाच ब्रास भरलेले एक टिप्पर जप्त करण्यात आल्याची घटना दि. ९ रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दगडगाव येथे घडली.
रेती माफिया उदंड झाले असून कुठल्याही परवानगी विना दिवसरात्र रेतीचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक सुरूच असल्याचे अनेक घटनेवरून समोर आले आहे. शासनाच्या करोडों रुपयाच्या महसुलला चुना लावला जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या सुरू असलेल्या रेती वाहतुकीची गुप्त मिळालेल्या माहितीनुसार दि. ९ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व पोलिस पथकांनी सोनखेड नजीक लोहा तालुक्यातील मौजे दगडगाव येथील रस्त्यावर अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक हायवा टिप्पर क्र. एमएच २६ सीएस ८८८० द्वारे होत असल्याचे व त्यात पाच ब्रास रेती आढळून आल्या प्रकरणी टिप्परला ताब्यात घेतले. टिप्पर व रेती असा एकूण ४५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून अनिल मारोती बुद्रुक रा. पांगरी यांच्या विरुद्ध सोनखेड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. सदरील कार्यवाहीत स्थागुशाचे पोनी उदय खंडेराय, उपनिरीक्षक महेश कोरे, पोकॉ दासरे, देवकत्ते यांनी यशस्वी कामगिरी बजावली.
Comments
Post a Comment