पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची शतकोत्तर परंपरा.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची शतकोत्तर परंपरा.
--------------------------------
बाजार भोगाव
सुदर्शन पाटील
--------------------------------
गणपती म्हटले की डोळ्यांसमोर येतात त्या रंगीबेरंगी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती; मात्र पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फे बोरगाव या गावाने गेली शंभराहून अधिक वर्षे शाडूच्या मातीच्या मूर्ती बसवण्याची परंपरा जपली आहे. गावची ही परंपरा असली तरी पर्यावरणपूरकतेचा आदर्शवत संदेश ती देत आहे.
गणेशोत्सव धार्मिक महत्त्वाचा असला तरी प्लास्टर, रासायनिक रंग व निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण गंभीर प्रश्न बनले आहेत. यासाठी शासन व सामाजिक संस्था जनजागृती करत आहेत. मात्र पोहाळे तर्फ बोरगाव गाव मात्र या साऱ्या प्रदूषणापासून दूर आहे. येथे गणेशमूर्ती पूर्णपणे शाडूमातीच्या व रंगविरहित असल्याने जलप्रदूषण होत नाही.
गावातील तरुण व ग्रामस्थांनी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांत अशा मूर्ती बसवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची शतकोत्तर परंपरा कायम ठेवली आहे. पर्यावरण जागृतीचा संदेश देणाऱ्या या गावचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
चौकट
गावात एकूण १० गणेश मंडळे असून सर्व मंडळांनी शाडूच्या गणेश मूर्ती बसवल्या आहेत.
मूर्तींची उंची ३ फूट ते ७ फूट दरम्यान आहे.
या सर्व मूर्ती वारनूळ, काटेभागाव व कळे येथील कुंभारांकडून तयार करून घेतल्या जातात.
चौकट २
शाडूच्या (मातीच्या) गणपती मूर्तीचे आध्यात्मिक व धार्मिक परंपरेतील महत्व खूप आहे. गणेशोत्सव हा केवळ आनंद-उत्साहाचा सण नसून तो निसर्गाशी, श्रद्धेशी आणि परंपरेशी निगडित आहे. शाडूच्या मातीच्या गणपती मूर्ती ही फक्त पर्यावरणपूरक नाही तर धर्मशास्त्र, परंपरा आणि अध्यात्म यांचा संगम आहे. ही मूर्ती बसवणे म्हणजे परमेश्वराशी निसर्गातून एकरूप होणे, पवित्रता आणि सकारात्मकता अनुभवणे.
कृष्णात दादू पाटील
फोटोओळ - सम्राट तरूण मंडळ ची गणेश मूर्ती
No comments: