कागल येथे सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयाने निपाणीच्या महिलेस अटक.
कागल येथे सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयाने निपाणीच्या महिलेस अटक.
---------------------------
सलीम शेख
---------------------------
:कागल बस स्थानकावर संशयास्पद फिरणाऱ्या निपाणीच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी -मंगळसूत्र जप्त केले आहे. ही घटना तारीख 30 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
सदरची महिला ही कागल बस स्थानक परिसरात संशयास्पद फिरत होती. नागरिकांनी पाठलाग करून तिला पकडले व कागल पोलिसांच्या स्वाधीन केली. तिच्याकडे तुटलेले चार ग्रॅम वजनाचे मणी- मंगळसूत्र सापडले. याबाबत चौकशी केली असता मालकी हक्काबाबत कोणताही पुरावा तिच्याकडे नव्हता, म्हणून महिला पोलीस अंमलदार शालिनी नवलसिंग मावळे यांनी पोलिसात रात्री उशिरा तक्रार नोंदवली.
कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment