जुगार खेळणाऱ्यांवर हातकणंगले पोलिसांची कारवाई
जुगार खेळणाऱ्यांवर हातकणंगले पोलिसांची कारवाई.
------------------------------
शशिकांत कुंभार
------------------------------
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील चोकाक परिसरात अवैधरीत्या तीन पत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या चार इसमांवर हातकणंगले पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई पोलिस कॉन्स्टेबल राहुल परशराम टोणपे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.
कारवाईत ताब्यात घेतलेले आरोपी पुढील प्रमाणे
गोरेसाब गुलाब पेंढारी (रा. मुडशिंगी)
विजय आदिनाथ समगे (रा. चोकाक)
रोहित रावसाहेब बुकशेटे (रा. चोकाक)
सोमनाथ शामराव अनुसे (रा. मुडशिंगी) अशी आहेत.
मोबाईल फोन (विवो, ओपो, सॅमसंग, रेडमी) – अंदाजे किंमत 46,000/- रुपये,रोख रक्कम – 2,800/- रुपये
तीन पत्त्यांचे संच,
तीन मोटारसायकली – अंदाजे किंमत 1,50,000/- रुपये
जुगार खेळताना वापरलेली 1,300/- रुपयांची चलनी नोटा असा एकूण ₹ 2,04,300/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक करोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
No comments: