गुटख्याची गटारगंगा! बडनेरा मार्गावर पोलिसांची कारवाई; 3 लाखाचा गुटखा जप्त, गुटख्याच्या ट्रक मागे बडनेरा कनेक्शन दोन जना विरुद्ध गुन्हा दाखल .
गुटख्याची गटारगंगा! बडनेरा मार्गावर पोलिसांची कारवाई; 3 लाखाचा गुटखा जप्त, गुटख्याच्या ट्रक मागे बडनेरा कनेक्शन दोन जना विरुद्ध गुन्हा दाखल .
पी.एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती - अमरावती येथे मालवाहू वाहनातून शासन प्रतिबंधित गुटखा तस्करी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 3 लाख 7 हजार 206 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सुमारास बडनेरा मार्गावर करण्यात आली असरखान मिया खान वय 50 कमेला ग्राउंड अमरावती असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे एक जण मालवाहू वाहनातून बडनेरा मार्गाने शासन प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करीत आसल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बडनेरा मार्गावर सापळा रचून सदर वाहन अडविले वाहन चालकाची चौकशी केल्यावर त्याने आपली ओळख अफसर खान मिया खान अशी दिली वाहनाचे पाहणी केल्यावर त्यात शासन प्रतिबंध गुटखा आढळून आला त्याच्याकडून गुटखा व मालवाहू वाहन असा 10 लाख 7 हजार 206 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याला गुटख्याबाबत विचारणा करण्यात आल्यावर त्याने तो अमीन शेख राहणार बडनेरा याचा असल्याचे सांगितले त्यानुसार या दोघाविरुद्ध बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अंमल कडू जाहीर शेख अतुल संबे राहुल डेंगेकर संदीप खंडारे यांनी केली.
No comments: