साताऱ्यात नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर सांभाव्य नगराध्यक्ष.
साताऱ्यात नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर सांभाव्य नगराध्यक्ष.
------------------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी - अमर इंदलकर .
-----------------------------------------
सातारा नगरपालिका आरक्षण जाहीर झाले असून सर्वसाधारण प्रवर्गातून हे आरक्षण जाहीर झाले आहे. दरम्यान आरक्षण जाहीर होताच दोन्ही राजांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. उदयन राजे शिवेंद्र राजे यांच्यात मनोमिलन होणार की नाही यबाबत शाशंकता असून दोन्ही गटाकडून उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. प्रभाग निहाय उमेदवारांचे आरक्षण येत्या बुधवारी जाहीर होणार असून आज रोजी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. खासदार उदयन राजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, तसेच युवा नेतृत्व संग्राम बर्गे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीकडून अमोल मोहिते, अविनाश कदम, रवींद्र ढोणे, यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उदयन राजेंच्या सातारा विकास आघाडीतील मनोज शेंडे यांना याआधी सातारा उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव असून त्यांना सातारा विकास आघाडीची मूठ बांधण्यात यश आले होते. त्यांचे कार्य अनेक विकास कामातून दिसून आले आहे. पालिकेतील कामाचा अनुभव आणि तरुण नेतृत्व म्हणून मनोज शेंडेकडे बघितले जाऊ शकते. तसेच संग्राम बर्गे यांच्या रूपात सातारा विकास आघाडी युवा चेहरा म्हणून बघितले जाऊ शकते.तर सर्वसाधारण प्रवर्गातून युवा महिला नेतृत्व म्हणून शिवणीताई कळसकर यांचे नावही चर्चेत आहे. तर दुसरीकडे नगरविकास आघाडीकडे अमोल मोहिते, अविनाश कदम, रवींद्र ढोणे यांच्या रूपात अनुभवी लोकांची फौजच अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. अविनाश कदम यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदाच्या अनुभवाबरोबर पालिकेच्या दीर्घ कामकाजचा अभ्यास आहे. नगरविकास आघाडीचा अभ्यासू आक्रमक चेहरा म्हणून अविनाश कदम यांच्याकडे पाहिले जाऊ शकते. तसेच अमोल मोहिते, रवींद्र ढोणे हे चेहरे देखील नगरविकास आघाडीकडे असल्याने विचारात घेतले जाऊ शकतात,यांचीही युवकांच्यात क्रेज असल्याने पालिकेतील शांत अभ्यासु म्हणून यांचाही विचार पालिकेसाठी केला जाऊ शकतो. अद्याप नगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दोन्हीही राजेंकडून आलेली नसून दोन्ही आघाड्या कडून संभाव्य नावे चर्चेत आहेत. ह्या वेळी साताऱ्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार अशी सुरुवात देखील झालेली आहे. मात्र धक्का तंत्र मध्ये दोन्हीही राजे माहीर असून ऐन वेळी खेळल्या जाणाऱ्या खेळीने काही जण नाराज होण्याची देखील शक्यता आहेच.
No comments: