Header Ads

स्वच्छता हीच सेवा — महात्मा गांधींच्या विचारांची प्रेरणा देणारे अभियान..

 🕊️ डॉ. मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये गांधी जयंती उत्साहात साजरी स्वच्छता हीच सेवा — महात्मा गांधींच्या विचारांची प्रेरणा देणारे अभियान.

जयसिंगपूर प्रतिनिधी :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात आयक्यूएससी प्रमुख डॉ. प्रियांका गायकवाड यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. या वेळी प्राध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गांधीजींच्या जीवनातील साधेपणा, सत्याग्रह आणि स्वच्छतेवरील शिकवण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.


यानंतर एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी झाडू हातात घेऊन महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. प्लास्टिक व अन्य कचऱ्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली.


या अभियानाचे नियोजन व आयोजन प्रा. प्रनील तोरसकर यांनी केले. उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शीतलकुमार पाटील, संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व व्हाईस चेअरपर्सन अॅड. डॉ. सोनाली मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

No comments:

Powered by Blogger.